You are currently viewing नियम पाळा… अन्यथा दुकानांना ठोकणार टाळे

नियम पाळा… अन्यथा दुकानांना ठोकणार टाळे

मुख्याधिकारी अवधूत तावडे यांचा इशारा

कणकवली

कोव्हीड काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार केवळ अत्यावश्यक दुकानेच सकाळी 7 ते 11 या वेळेत उघडण्यास मुभा असतानाही नियमभंग करून अन्य दुकानेही सुरू ठेवण्याचे प्रकार घडताहेत. वारंवार सूचना देऊनही अत्यावश्यक सेवेत न मोडणारे दुकानदार ऐकत नसतील तर अशा दुकानांना कोरोना संपेपर्यंत टाळे ठोकणार असल्याचा सज्जड इशारा कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी दिला आहे.

कणकवली शहराचा कोरोना पॉझिटिव्हीटी रेट सर्वाधिक आहे. अगदी 28 मे रोजी पटवर्धन चौकात रॅपिड टेस्ट मध्ये 16 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. 28 मे रोजी महसूल, पोलीस आणि नगरपंचायत च्या पथकाने संयुक्त कारवाई करत अत्यावश्यक नसलेली दुकाने उघडणाऱ्या चौघा व्यापाऱ्यांवर 40 हजारांची दंडात्मक कारवाई केली होती तर दोघांवर गुन्हे दाखल केले. त्याचा परिणाम होऊन आज 29ए रोजी बाजारपेठेतील गर्दी कमी झालेली दिसली. नगरपंचायत मुख्याधिकारी अवधूत तावडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे पटवर्धन चौकात ठाण मांडून होते. पटवर्धन चौकात आजही अनावश्यक फिरणाऱ्यांची रॅपिड टेस्ट केली जात आहे.कणकवली बाजारपेठेत अत्यावश्यक नसलेली काही दुकानेही आज सुरू होती. मात्र मुख्याधिकारी तावडे आणि एपीआय खंडागळे यांनी बाजारपेठेच्या दिशेने कूच करताच सकाळीच साडे दहा वाजताच अशा दुकानदारांनी आपली शटर डाऊन करत संभाव्य दंडात्मक कारवाई टाळली.

प्रतिक्रिया व्यक्त करा