आचारी कामात रमलेल्याचा घराशेजारी जंगलात बैठक.
लॉकडाऊनचा सर्वात जास्त फायदा आणि बसून पैसे कमविण्याचे साधन जर काय तयार झाले असेल तर ते जुगार. जुगाराच्या बैठका आज फोंडा, वेंगुर्ला, कट्टा अशा जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी बसू लागल्या आहेत. खाकी वर्दीशी मांडवली करून महिना हफ्ता ठरवून जिकडे तिकडे गैरधंदे वाढत आहेत. त्यात सर्वसामान्य खेळी करणारा जुगारी देशोधडीला लागतो आणि तक्षीम असणाऱ्या सोबतच जुगाराच्या अड्डयाना परवानगी देणारे खाकीचे शिलेदार मात्र मालामाल होतात.
मालवण तालुक्यातील कट्टा येथे आचारी कामात रममाण असणाऱ्याच्या घरा शेजारील जंगलात रोज सकाळी १० ते ६ वाजेपर्यंत अगदी बिनधास्तपणे जुगाराची बैठक सुरू असते. आचारी कामात रमत असलेल्या च्या घराशेजारी ५६ टिकली म्हणून प्रसिद्ध असणारा मुन्नाभाई संजूबाबा आणि रावल गाव वाला धन्या हे दोघे हा अड्डा चालवत आहेत. अड्ड्यावर संकट येऊ नये आणि धाड पडली तर सावधानी म्हणून दिवशी १००० रुपये पगार देऊन क्षय नसलेला तो अ-क्षय आणि वट पौर्णिमेला पूजतात तो व कामाला ठेवले आहेत. जुगाराचा बादशाह दात पडक्या आप्पा देखील याच अड्ड्यावर असतो.
कट्टा येथील जुगाराची बैठक सहीसलामत चालते ती मुंडके म्हणजे मुंडी असलेल्या खाकीच्या शिलेदाराच्या जीवावर. हा मुंडी असणारा महिना १०००० हफ्ता घेतो. आचारी कामात रमत असलेल्याच्या घरापासून २०० मीटर अंतरावर घराच्या उजव्या बाजूला ही बैठक बसते. मोबाईल फोनच्या आधारवर खेळ चालतो. मोबाईल सुरू ठेऊन पहारेकरी खेळयाना जंगलात पाठवतात. ५६ टिकली फेम मुन्नाभाई, रावल गाव वाला धन्या, राणे, बंटी, दात पडक्या आप्पा, बामण, दूधवाला मया, चिली वाला शेट, मोर म्हणजे मयूर, आणि मशेरी लावणारा असे दिग्गज या जुगाराच्या बैठकीला असतात.
लोकांना रस्त्यावर येण्यास, गर्दी करण्यास मज्जाव करणारे खाकी प्रशासन जुगाराच्या बैठकीत आपले हात ओले होतात म्हणून मुंडी असणाऱ्या कलेक्टर च्या हातून महिना हफ्ता घेऊन जुगाराच्या माध्यमातून कोरोनाचा फैलाव करत आहेत. कोरोनाचा वाढता प्रभाव हा घरातून मास्क लावून बाहेर पडणाऱ्यांपेक्षा, दिवसारात्री एकत्र बसून जुगारात पत्ते कुटणाऱ्यांपासून नक्कीच जास्त होत असावा.