You are currently viewing जुगार आणि जुगारी पाठ काही सोडत नाहीत

जुगार आणि जुगारी पाठ काही सोडत नाहीत

*यांचे मात्र वराती मागून घोडे.*

 

फोंडा हे जिल्ह्यातील जुगाराचे मोठे प्रस्थ होत चालले आहे. जिल्ह्याच्या घाट माथ्यावर जाणाऱ्या सीमेवर असलेलं फोंडा अलीकडे जुगाऱ्यांची हक्काची बैठकीची जागा म्हणून समोर येत आहे.   *आपू वरात* तर जुगार आटोपला की उगाचच धाड टाकल्याचं नाटक करतात आणि आपला हफ्ता घेऊन मोकळे होतात.

शुक्रवारी फोंडा-धर्येवाडी येथे दुपारी १२.३० स्टॅ.टा. वर घराकडेच पारावरच्या विठ्ठलाचा पट बसला. पारावरच्या विठ्ठलाची या बैठकीत ८० पैसे तक्षीम होती, तर इतरांची २० पैसे….. पहिल्या पटात मिळाले होते तब्बल पंचेचाळीस हजार रुपये….दुसऱ्या पटात मात्र जसा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना वाढतो तशीच कमाईत वाढ होत मिळाले ६५ हजार रुपये.

पारावरच्या विठ्ठलाने दुपारी पटासाठी आलेल्या बैठककारांना भाकरी आणि बटाट्याच्या भाजीचे जेवण दिले. त्यामुळे बैठकींसाठी आलेले सुद्धा ताजेतवाने झाले होते. पारावरच्या विठ्ठलाची ही बैठक संध्याकाळी ५.३० वाजता आटोपली आणि खेळी आपापल्या घरी परतले.

बैठक आटोपली आणि खेळी परतले ही खबर लागल्यावर की उपरती आल्यावर ६.०० स्टॅ.टा. वर *आपू वरात* याने व्हिलन सारखी एन्ट्री मारली अर्थात जुगाराच्या बैठकीवर धाड टाकली. बैठक संपता संपता धाड टाकणाऱ्याला मात्र सापडल्या रिकामी पाण्याच्या बाटल्या… आणि रमी खेळणारे( आजकाल मोबाईल वर सुद्धा खेळतात) काही नमुने. एकंदरीत फोंडयात जुगाराच्या मैफिली बसतात, सजतात आणि पैसे कमावून निघून जातात. सर्व खबरी *वरती मागून घोडे नाचवणाऱ्या आपू वरात ला असतात, पण कनवटीत माया येत असल्याने त्यावर हेतुपुरस्सर दुर्लक्ष होतो आहे.* असे हे आणखी किती दिवस चालणार? वरिष्ठ याकडे लक्ष देणार का? जिल्ह्याचे पालकमंत्री वरिष्ठांना जाब विचारणार की कोरोना रस्त्यावर फिरून वाढतो असंच म्हणत राहणार?

*रस्त्यावर विनाकारण फिरणारे म्हणून सर्वसामान्य लोकांची रॅपिड टेस्ट केली जाते आहे, आणि जिथून बैठकांवर बैठका होऊन कोरोनाची लॉट मध्ये उत्पत्ती होते त्या जुगाराच्या बैठकांना मात्र आपू वरात मुळे अभय मिळते आहे.* जुगाराच्या बैठकांमधून कोरोना प्रसार होत नाही असेच या प्रकारावरून समजून जायचे का?

प्रतिक्रिया व्यक्त करा