खा. नारायण राणेंची विनंती; भाजपच्या माध्यमातूनच मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकर मार्गी लागेल
मराठा आरक्षणासाठी भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर खा. नारायण राणे यांनी छत्रपती संभाजी राजे यांना राजीनाम्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे.
तुमच्या राजिनाम्याने हा प्रश्न सुटणार नाही. तुम्ही जी मोहीम हाती घेतली ती भाजप मध्ये राहून घेतल्यास मराठ्यांना नक्कीच लवकर आरक्षण मिळेल. त्यामुळे राजीनामा न देता योग्य व्यक्तींना जर भेटलात, ज्यांच्यामध्ये क्षमता आहे, तर प्रश्न सुटू शकतो, असं खा. राणेंनी म्हटलं आहे.