कणकवली
शहरातील कनक नगर येथील राकेश रमेश कितुरे ( २५ मूळ रा. इचकरंजी ) यांने राहत्या घरी स्वयंपाक गृहातील छताच्या पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी संध्याकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास उघड झाली.
राकेश कितुरे हा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करत होता. आपल्या मित्रांसह कनक नगर येथे राहत होता. गुरुवारी त्याने राहत्या घरी स्वयंपाक गृहातील छताच्या पंख्याला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावत आत्महत्या केली. काल गुरुवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास दोरीला लटकत असलेल्या अवस्थेत त्याच्या मित्राने पहिले
मात्र या आत्महतेचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नाही.
याबाबत जयदीप हिंदुराव ऐकल याने कणकवली पोलीस ठाण्यात या घटनेबाबत माहिती दिली. शवविच्छेदनंतर शुक्रवारी सकाळी इचलकरंजीहुन आलेल्या त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.