सिंधुदुर्गनगरी
कोरोना बाधीत रुग्णांना उपचाराकरिता रुग्णालयापर्यंत पोहचवणे व उपचारानंतर बरे झालेले रुग्ण घरी सोडण्यासाठी खाजगी मालकीच्या नोंदणी झालेल्या रुग्णवाहिकांकरिता प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने पुढील प्रमाणे दर निश्चित केले आहेत.
25 कि.मी. पर्यंत अथवा 2 तासांकरिता मारुती व्हॅनसाठी 750 रुपये, टाटा सुमे, मॅटोडोर सदृष्य कंपनीने बांधणी केलेल्या वाहनासाठी 900 रुपये, टाटा 407, स्वराज माझजा आदींच्या साठ्यावर बांधणी केलेल्या वाहनांसाठी 1 हजार रुपये, आय.सी.यु. अथवा वातानुकुलीत वाहनांसाठी 1 हजार 200 रुपये दर असणार आहे. तसेच प्रति किमी भाडे पुढील प्रमाण असेल. मारुती व्हॅन, टाटा सुमे, मॅटोडोर सदृष्य कंपनीने बांधणी केलेल्या वाहनासाठी 14 रुपये, टाटा 407, स्वराज माझजा आदींच्या साठ्यावर बांधणी केलेल्या वाहनांसाठी 20 रुपये, आय.सी.यु. अथवा वातानुकुलीत वाहनांसाठी 24 रुपये प्रति किलोमीटर या प्रमाणे दर निश्चित करण्यात आले आहेत.
नागरिकांच्या सोयीसाठी उप प्रादेशिक पहिवहन कार्यालयात रुग्णवाहिकेसाठी कंट्रोल रुमची स्थापनाही करण्यात आली आहे. सदर कंट्रोल रुम येथे 9359788334 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. खाजगी रुग्णवाहिका चालक, मालक यांनी निश्चित केलेल्या दरापेक्षा जादा मागणी केल्यास उप प्रादेशिक परिहवन कार्यालयातील कंट्रोल रुम येथे नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन राजेंद्र सावंत, उप प्रादेशिक पहिवहन अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.