..अखेर कोलझर गावात कोरोनाचा शिरकाव झाला. कोलझर ग्रामसेवक नामदेव अर्जुन परब यानी सावंतवाडी येथे संजु विरनोडकर याच्याशी संपर्क करून गावातील भितीदायक परिस्थिचीचे वातावरण व कोरोनाचा प्रार्दुभाव गावात पसरू नये याची जाणिव करून दिली. सुकलवाड, मालवण येथिल निर्जतुकिकरणाच काम आटपुन हि टीम कोलझर येथे दाखल झाली. येथिल टेंमवाडी येथे कोरोनाबाधित रूग्ण सर्वात जास्त सापडल्यामुले या संपुर्ण वाडीवरील सर्व घरोघरी व बाधितांच्या प्रत्यक्ष घरात, रूग्णाच्या खोलीत, स्वच्छतागृहात, रस्त्यावर जंतुनाशक फवारणी करून निर्जतुकीकरण करुन संजु विरनोडकर टिंमने धाडसी ऊपक्रम राबवला. त्याच प्रमाणे या गावात असलेल्या मधलीवाडी, क्रिच्छवाडी याही ठिकाणी रेडझोन घरांमध्ये, बाजारपेठ,सार्वजनिक ठिकाणी, आरोग्य उपकेन्द्रं अश्या वर्दळीच्या ठिकाणी निरजंतुकीकरण केले. उपस्थित असणाऱ्या सरपंच सौ उर्मिला देसाई यांनी ही टीम प्रत्यक्ष करोना बाधितांच्या घरात जाऊन निर्जंतुकीकरण फवारणी करते व करोना बाधित परिवाराचे शेजारील नागरीकांचे पण मनोबल वाढवते म्हणून या धाडसी ऊपक्रमाचे कौतुक केलं. या गावचे कार्यकर्ते आप्पा देसाई यानीही स्वतः सहभाग घेवून या फवारणीमुळे गावातील नागरिक समाधानी झाले म्हणाले. दुपारी साडेतीन ते रात्री आठ वाजेपर्यत हि टिम निर्जंतुकीकरण करत असताना ग्रामसेवक नामदेव परब, लिपीक कृष्णा देसाई, कर्मचारी सखाराम राणे, आरोग्य सेविका सुप्रिया तेडोलकर,आप्पा देसाई व संजु विरनोडकर टिमचे संतोष तलवणेकर, आकाश मराठे, सागर मलगावकर, तुषार बांदेकर हे ऊपस्थित होते.
ता. दोडामार्ग. कोलझर. रेड झोन – संजु विरनोडकर टिमने केले निर्जंतूकीकरण…….
- Post published:मे 28, 2021
- Post category:दोडामार्ग / बातम्या
- Post comments:0 Comments