या मोहीमेत कुडाळचे माजी सभापती किशोर मर्गज यांच्या पुढाकार
कुडाळ :
१५-१६ मे ला सिंधुदुर्ग नव्हे तर कोकण पट्टीमध्ये चक्रीवादळाने, पावसाने हाहाकार उडवल्यामुळे ठीक ठिकाणचे रस्ते व खेड्यापाड्यातली वीज झाडे पडून बंद पडला होती. रस्त्यावर मोठ मोठी झाडे पडली होती. अशा अवस्थेमध्ये रस्त्यावरून वाहतूक करणे सुद्धा वाहनांना बंद झाले होते. त्यावेळी गावातील लोकप्रतिनिधी समाजसेवी तरुणांना घेऊन गावातील ब्लॉक झालेले रस्ते व काम पूर्ण होण्यास महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना मदत करून रस्ता व वीज सुरळीत करण्याचे प्रयत्न सिंधुदुर्गाच्या विविध भागात लोकांकडून केले जात होते.
तशी मोहीम कुडाळचे माजी सभापती किशोर मर्गज, माजी पोलीस अधिकारी पी. टी. मर्गज, प्राथमिक शिक्षक बाळकृष्ण मर्गज, एसडीसी बँकेचे कर्मचारी उमेश तेरसे, स्वानंद मेस्त्री, विराज मर्गज या तरुणांच्या मदतीने रस्त्यावर पडलेली झाडे कुऱ्हाडी, कटिंग मशिनच्या सहाय्याने दूर करत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. या त्यांच्या उपक्रमाबद्दल पांग्रड भडगाव पंचक्रोशी मधून समाधान व्यक्त केले जात आहे. स्वतः जातीनिशी किशोर मर्गज, पोलीस अधिकारी पि.टी. मर्गज हे स्वतः रस्ता निर्धोक करण्याचे सहकार्यांसोबत काम करत रस्ता सुरळीत करण्याच्या कामगिरीला लागले होते. प्रसिद्धीपरांमुख राहून काम करण्याच्या किशोर मर्गजच्या या कामगिरीबद्दलबद्दल ग्रामस्थांतून समाधान व्यक्त केले जात आहे. कोणतीही सामाजिक, नैसर्गिक आपत्ती असो सगळे मतभेद बाजूला सारून किशोर मर्गज हे मदत करायला नेहमी पुढे असतात. त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय या चक्रीवादळात नुकसान झालेल्यांना मदत करण्याच्या या उदाहरणातून लोकांसमोर आलेला आहे.