वंदणगावी जन्मली ती,
गरिबांच्या पोटी रमाई.
कष्टकरी बाप भिकू,
रुक्मिणी तिची आई.
आईबाप दोघांचेही,
छत्र हरपले बालपणी.
जबाबदारी भावंडांची,
आघात झाला तिच्या मनी.
पती भीमराव महामानव,
रमाईची मिळे खंबीर साथ.
अपार कष्ट करुनी जीवनी,
दुःखांवरही तिने केली मात.
घर चालविण्यासाठी रमाई,
शेण- गोवऱ्या थापत असे.
पतीचे धेय्य गाठण्यासाठी,
स्वतःची पर्वा कधीही नसे.
निष्ठा त्याग अन कष्टाने,
संसाराचा गाडा हाकला.
उपाशी मुलांच्या अन्नसाठी,
सोन्यासहीत डबा विकला.
शेवटच्या क्षणी भीमराव,
उशाशी रमाच्या बैसोनी राही.
एकटक पतीदेवाच्या नयनी,
रमाई निरोप घेताना पाही.
(दिपी)✒️
दीपक पटेकर सावंतवाडी.