नियमांची अंमलबजावणी झाल्यास बेडची संख्या वाढवण्याची गरज नाही…
वेंगुर्ले
सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता कोरोना साथ नियंत्रणात आणणे सोपे आहे.मात्र त्यासाठी जिल्ह्याच्या सीमा योग्य पद्धतीने बंद करा, तसेच चोरट्या पद्धतीने येणार्यांना रोखा, अशी मागणी वेंगुर्ला येथील सामाजिक कार्यकर्ते एम.के. गावडे यांनी केली आहे.याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तसे झाल्यास नक्कीच रुग्णांची संख्या आटोक्यात येईल.आणि बेडची संख्या वाढवण्याची गरज लागणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याबाबत श्री.गावडे यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.