You are currently viewing सिंधुदुर्ग बेस्ट मॉडेल स्पर्धेत बांदा केंद्रशाळेचा नील बांदेकर जिल्हयात प्रथम.

सिंधुदुर्ग बेस्ट मॉडेल स्पर्धेत बांदा केंद्रशाळेचा नील बांदेकर जिल्हयात प्रथम.

बांदा

किड्स मॉडेलिंग कुडाळआयोजित जिल्हास्तरीय सिंधुदुर्ग बेस्ट मॉडेल या स्पर्धेमध्ये बांदा नं.१केंद्र शाळेचा विद्यार्थी
नील नितीन बांदेकर याने जिल्हयात प्रथम क्रमांक पटकावला . त्याला पाच हजार रुपये पर्यंतचे गिफ्ट व्हाऊचर सोबत मॉडेलिंग ड्रेस बक्षीस मिळणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून सदर स्पर्धा ही १४वर्षाखालील सर्व मुलामुलींसाठी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
सुरवातीला विद्यार्थ्यांचे स्टायलिश फोटो मागविण्यात आले त्याचे लूक पाहुन निवडलेल्या स्पर्धकांची भाषण शैली व आॉनलाईन स्वरूपात मुलाखततीत प्रश्न विचारून हजरजबाबीपणा पाहून अंतिम निवड करण्यात आली.
गेले वर्षभर लाॅकडाऊन कालावधीत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धात्मक उपक्रमात बांदा शाळेचे विद्यार्थी नेहमीच अव्वल राहिले आहे. यामध्ये नील बांदेकर यानेही आजवर अनेक स्पर्धांमध्ये विविध प्रकारचे यश संपादन केलेले आहे .
या वेगळ्या धाटणीच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून त्याने आपलेअष्टपैलू व्यक्तिमत्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. निलला तिची आई गौरी बांदेकर व वडील नितीन बांदेकर यांचे मार्गदर्शन मिळाले.
निलने मिळवलेल्या या यशाबद्दल बांदा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, मुख्याध्यापक सरोज नाईक, सरपंच अक्रम खान, शिक्षक वर्ग व पालक यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा