सावंतवाडी
राज्य शासनाच्या नवीन नियमानुसार होम आयसोलेशन बंद करण्यात आले असून, त्यानुसार सावंतवाडी तालुक्यात १० ठिकाणी विलीगिकरण कक्ष उभारण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
सावंतवाडी तालुक्यात शेरले डिवाइस मर्सी, आंबोली सैनिक स्कूल, माडखोल फार्मसी कॉलेज, रोणापाल स्वामी दयानंद हॉस्टेल, सांगेली नवोदय विद्यालय, कोलगाव स्टेपिंग स्टोन, सातार्डा हायस्कूल, माजगाव हायस्कूल, मळगाव हायस्कूल, मळेवाड हायस्कूल या १० ठिकाणी विलगीकरण कक्ष उद्यापासून सुरू करण्यात येणार आहे. यापुढे स्वॅब टेस्ट करणाऱ्यांना पॉझिटिव्ह आल्यास त्याला होम विलगीकरण न करता, या विलगी करण कक्षात ठेवण्यात येणार आहे. तसेच तालुक्यात ४० विलगीकरण कक्ष निर्माण करण्यात येणार असून, त्यातील १० कक्ष उद्यापासून कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी यावेळी दिली आहे.