दोडामार्ग
तालुक्यातील कोरोना रुग्ण ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे दगावता कामा नये यासाठी आपण विविध मार्गातून मदतीस तयार असून त्याच भावनेतून फरा प्रतिष्ठान केर ता.दोडामार्ग यांच्या वतीने दोडामार्ग तालुक्यातील कोविड रुग्णांच्या सेवेसाठी आवश्यक तसेच अत्यावश्यक आरोग्य विषयक उपकरणे सुपूर्द करत असून आरोग्य विभागाने सदर रुग्णांना सेवा पुरवावी असे आवाहन फरा प्रतिष्ठान, केरचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी दोडामार्ग आरोग्य विभागाला केले.
ऑक्सिजन फ्लोमिटर, नेब्युलायझर, थर्मामीटर, सेनिटायझर, डिस्पोजेबल मास्क, बेन्झिल सेफ्टाॅल, एक्झामिन ग्लाऊज, पल्स आॅक्सिमिटर, डिस्पोझेबल सिरिंज आदी उपकरणे त्यांनी फरा प्रतिष्ठान मार्फत दोडामार्ग कोव्हिडं केअर सेंटरला सुपूर्द करण्यात आली यावेळी श्री देसाई बोलत होते. त्यांनी हे साहित्य आज दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्वर ऐवळे यांच्याकडे सुपूर्द केले.
यावेळी प्रेमानंद देसाई यांसह बाबुराव धुरी, सामाजिक कार्यकर्ते शैलेश दळवी, फरा प्रतिष्ठानचे सर्वेश देसाई, वकील सोनू गवस, चंदू मळीक, दयानंद धाऊसकर, प्रवीण गवस रामदास मेस्त्री, ग्रामसेवक श्री पाटील तसेच फरा प्रतिष्ठान चे पदाधिकारी उपस्थित होते.
ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळे रुग्ण दगावता कामा नये यासाठी दोडामार्ग तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते प्रयत्नशील असून आज सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा नेते शैलेश दळवी यांनी २ ऑक्सिजन फ्लोमिटर व माजी जि प सदस्य चंदू मळीक यांनी १ ऑक्सिजन फ्लोमिटर डॉ ज्ञानेश्वर एवळे यांच्याकडे सुपूर्द केले. कोरोना प्रसाराच्या काळात दोडामार्ग तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तळमळीने करत असलेल्या कार्याबद्दल डॉ ज्ञानेश्वर ऐवळे यांनी विशेष आभार मानले आहेत.