You are currently viewing नुकसान भरपाई हा कोकणी माणसाचा हक्कच!

नुकसान भरपाई हा कोकणी माणसाचा हक्कच!

 नुकसानीबद्दल न बोलण्याची प्रवृत्ती आता पुरे, बोला बेधडक!!

भाजपा सोशल मीडिया सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश सदस्य अविनाश पराडकर यांचे आवाहन

कोकणी माणसाचा मुळातच शासकीय यंत्रणेच्या ढिलाईमुळे न्यायावरचा विश्वास उडालेला आहे. याचा आणखीनच गैरफायदा घेत या यंत्रणेकडून पंचनामा करण्यात चालढकल केली जाते. कालच्या वादळातही घर-मांगर यांच्या नुकसानीचे मोघम पंचनामे केले गेले. परंतु उत्पन्न देणारी झाडे, माड, किनाऱ्यावर काढलेल्या मच्छिमारी बोटींवर झाडे पडून झालेले नुकसान, केबल व्यावसायिकांचे केबल तुटून झालेले नुकसान, खारे पाणी विहिरीत घुसून झालेले नुकसान आदी बाबींचा नुकसान पंचनामा एकतर झालेलाच नाही, किंवा थातूर मातूर झालेला आहे.

कोकणी माणसाने आता पुढे येऊन आपल्या प्रत्येक पैशाच्या नुकसानीबद्दल बोलले पाहिजे. यासाठी The Fifth Pilar या सामाजिक न्याय मिळवून देणाऱ्या सोशल प्लॅटफॉर्मचा वापर करून आपले म्हणणे त्यांच्यापर्यंत पोहोचवावे, असे अविनाश पराडकर यांनी म्हंटले आहे.

यामागची पार्श्वभूमी अशी आहे की मागील आठवड्यात कोकणात झालेल्या तौक्ते चक्री वादळामुळे बागायतदार शेतकरी,मच्छीमार बांधव व ग्रामस्थांचे खूप मोठे नुकसान झाले. एवढे मोठे नुकसान होऊनही अजून योग्य पद्धतीने पंचनामे होऊन नुकसानग्रस्तांना मदत जाहीर झालेली नाही. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या एकूण एक नुकसानाचे योग्य पद्धतीने पंचनामे व्हावेत, अजूनही पंचनामे न झालेल्यांना प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी The Fifth Pillar हे फेसबुक पेज व युट्युब चॅनेल काम करत आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीचे व्हिडीओ,फोटो,अर्ज आपल्या झालेल्या नुकसानीच्या माहितीसह कोकणातील बागायतदार शेतकरी,मच्छीमार बांधव व ग्रामस्थ यांनी 7304506999 या व्हाट्सअप्प नंबरवर पाठवावेत. आपण पाठवलेली माहिती The Fifth Pillar च्या फेसबुक पेज व युट्युब चॅनेलवर अपलोड करण्यात येईल.

आवश्यक सूचना :
1. व्हिडीओ फक्त १ मिनिटांचा असावा
2. वादळग्रस्त शेतकरी, मच्छीमार,घर किंवा गोठा यांचे नुकसान झालेले ग्रामस्थ यांनीच स्वतः सदर व्हिडिओत बोलणे आवश्यक आहे,कारण हे चॅनल बनवताना नागरी पत्रकारिता (सिटीझन जर्नालिझम) हे तत्व ठेवले गेले आहे.
3. व्हिडिओत सर्वप्रथम स्वतःचे नाव, वाडी,गाव, तालुका, जिल्हा याची माहिती द्यावी.
4. त्यानंतर किती प्रमाणात नुकसान झाले आहे व पंचनामा झाला अथवा नाही किंवा चुकीचा झाला असल्यास त्याची माहिती द्यावी.
5. कोणतीही राजकीय अथवा सरकारवरची टीका टिपण्णी करू नये.
6. व्हिडिओ अगोदर काढला असल्यास वरील माहिती व्हाट्सअप्प वर टाइप करून पाठवावी.
7. व्हिडीओ नसल्यास नुकसानीचे फोटो पाठवावेत.
8. व्हिडीओ, फोटो व माहिती 7304506999 ह्या व्हाट्सअप्प नंबरवर पाठवावी.

सूचनांचे पालन करून The Fifth Pillar च्या तळमळीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांनी साथ देत “आपली नुकसान भरपाई- आपला हक्क” नक्की मिळवावा, असे आवाहन अविनाश पराडकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 5 =