You are currently viewing आमदार दीपक केसरकर यांच्याकडून दोडामार्ग कोव्हीड सेंटरला दहा ऑक्सिजन फ्लो मीटर

आमदार दीपक केसरकर यांच्याकडून दोडामार्ग कोव्हीड सेंटरला दहा ऑक्सिजन फ्लो मीटर

दोडामार्ग

दोडामार्ग कोविड केअर सेंटरमधील रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजन बेडची गरज लक्षात घेवून आमदार दीपक केसरकर यांनी आज दहा ऑक्सिजन फ्लो मीटर दिले. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी ते फ्लो मीटर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्वर ऐवळे यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी डॉ. रामदास रेडकर, युवासेनेचे तालुका उपप्रमुख भगवान गवस, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख आनंद रेडकर, चंदन गावकर, लवू मिरकर, प्रणय मोरजकर, झरेबांबर सरपंच स्नेहा गवस, संजय गवस आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा