कोरोनामुळे अवघ्या विश्वात एक अभूतपूर्व आणि भयंकर स्थिती निर्माण झाली.चायनापासून सुरु झालेली ही महामारी हा हा म्हणतात साऱ्या जगात झपाट्याने पसरली.आपल्या देशातही या महामारीचं थैमान सुरु आहे. सुमारे शंभर दिवसापासून आपण या महामारीच्या विरोधात लढत आहोत.
या लाँकडाऊनमुळे देशभरात अनेक सामाजिक, आर्थिक समस्या निर्माण झालेल्या आहेत. लघुउद्योग, विमानसेवा, रेल्वेसेवा, काँरपोरेट क्षेत्र, बांधकाम व्यवसाय, पर्यटन,सरकारी आस्थापना, खाजगी आस्थापना हे सगळं ठप्प झाल. यामुळेच रोजगाराची कोरोनापेक्षाही भयंकर स्थिती निर्माण झाली.. कित्येकजण निराशेच्या गर्दीत लोटले गेले. आत्महत्या, डिप्रेशन, कौटुंबिक हिंसाचार याच्या बातम्या कानावर पडू लागल्या…. अशावेळी आपल्या ज्ञानाचा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सदुपयोग करुन देशात अशा परिस्थितीत सकारात्मक वातावरण तयार करण्याचे अभूतपूर्व काम आमचे कोकणसुपूत्र आदरणीय सुरेशजी प्रभू यानी केले.
सुमारे शंभर दिवसात प्रभूसाहेबांनी देशातील व परदेशातीलही विविध शैक्षणिक संस्था, विद्यापीठे,खाजगी आस्थापना,तांत्रिक शिक्षण देण्याऱ्या संस्था, कौशल्य विकासाची संकल्पना राबवणाऱ्या संस्था या माध्यमातून युवक,महिला,शेतकरी, प्राध्यापक, लघुउद्योगजक अशा विविध घटकांना सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक पर्यावरण, पर्यटन, शेती, मस्यव्यवसाय, वैद्यकीय, अशा क्षेत्रातील रोजगाराच्या संधी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठीची सकारात्मक मानसिकता साहेबांनी विविध वेबनारच्या माध्यमातून निर्माण केली.ही आकडेवारीही आश्चर्यकारक आहे. देशातील आणि परदेशातील विविध १७५ हून जास्त संस्थानी साहेबांना निमंत्रित केल होत. कधी एक तास..दिडतास तर कधी दोन दोन तास साहेब परिपूर्ण अशी विषयाची मांडणी करतात.याचा लाभ देशविदेशातील सुमारे दिड कोटीहून जास्त लोकांनी घेतला.
हि मांडणी ऐकल्यावर मला माझ्या विविध क्षेत्रातील अनेक मित्रांचे फोन येतात.त्यांचा एकच प्रश्न असतो ,”प्रभूसाहेब एवढ्या सगळ्याच विषयाचं परिपूर्ण ज्ञान आपल्या एकाच डोक्यात कसं काय ठेवतात.. बरं त्यांची कोणत्याही विषयाची मांडणी ही ऐकणाऱ्या प्रत्येकाला सकारात्मक विचार करायला लावते.
मागच्याच आठवड्यात मला आमच्या जिल्ह्यातील तीन पदवीधर युवक फोन करुन भेटायला आले..ते आल्या आल्या मला म्हणाले….,”आम्ही मा.प्रभूसाहेबांचे काही विषयांवरील विचार आँनलाईन ऐकले…आम्ही थोडे डिप्रेशनखाली होतो..पण साहेबांचे प्रभावी व मनपरिवर्तन करणारे विचार ऐकून आमच्या लक्षात आलं की आता नकारात्मक विचार न करता आत्मनिर्भर होण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.” हे त्या युवकांचे विचार ऐकल्यावर प्रभूसाहेबांच्या विचारात काय ताकद आहे याची मला अनुभूती आली.
आपल्या देशातील कितीतरी जण लाँकडाऊनमुळे जगाच्या विविध भागात, देशात अडकले होते.ते स्वतः आणि त्यांची कुटुंब चिंतातूर होती.त्या परिस्थितीत आपल्या मायदेशी येणे ही गोष्ट फारच कठीण होती…पण अशा शेकडो भारतीयांना मदतीचा हात कुणी दिला असेल तर तो प्रभूसाहेबांनी.. स्वतःच्या कर्तृत्वाने आणि आपल्या एका वेगळ्या कार्यशैलीमुळे साहेबांनी मंत्री असताना म्हणा किंवा आता शेर्पा म्हणून जबाबदारी पार पाडत असताना अनेक देशातील महनीय व्यक्ती,दुतावास यांच्याबरोबर प्रस्थापित केलेले सौहार्दपूर्ण संबंध या भारतीयाना मायदेशात आणण्यासाठी कामी आले.जे शेकडो अडकलेल लोक भारतात आले त्यापैकी मोजकेच साहेबांच्या संपर्कातील किंवा माहितीतील असतील.मात्र असे अनेकजण आहेत की साहेबांच्या ओळखीचे नाहीत… पण ते आपले भारतीय बांधव आहेत हा एकच निकष साहेबांनी लावून मदत केली.
लाँकडाऊनमुळे साहेबांना मोकळा वेळ मिळाला खरा पण त्या वेळेचा उपयोग साहेबांनी खऱ्या अर्थाने एक संकटमोचक म्हणूनच केला.प्रत्येक विषयाच अगाध ज्ञान,राष्ट्रनिर्माणासाठी सातत्याने काम करण्याची इच्छा आणि अफाट उर्जा यामुळेच ते या देशातील प्रत्येकाला प्रभूसाहेब आदरणीय आहेत.
अँड.नकुल पार्सेकर
सावंतवाडी.