प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते या पंक्तीला अगदी शोभून दिसते अशी यशस्वी उद्योजिका आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची सुविद्य पत्नी म्हणजे सौ.निलम नारायण राणे होय.
नारायण राणेंनी राज्याच्या राजकारणातील प्रतिष्ठेची सर्व पदे उपभोगली आहेत, त्यांच्या या यशाच्या मागे त्यांना खंबीर साथ दिली ती त्यांची सुविद्य पत्नी सौ. निलम राणे यांनी…
नारायण राणेंचे दौरे असो वा उद्योग व्यवसाय सर्व नियोजन पद्धतशीररीत्या करत आपल्या पतीच्या पाठीशी खंबीर उभी राहणारी गृहलक्ष्मी निलमताई होय. त्यांच्याकडे मदतीसाठी गेलेल्या कोणालाही त्यांनी कधी रिकामी हाताने परत पाठवले नाही, महिलांसाठी अनेक उपक्रम राबवून कित्येक महिलांच्या हाताला काम दिले आहे. नारायण राणे यांची पत्नी असल्याचा बडेजाव त्यांच्या वागण्या बोलण्यात कधीच नसतो. त्यामुळेच जनमानसांत आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
नारायण राणे यांचे इंजिनियरिंग कॉलेज असो वा इतर व्यवसाय, निलमताई अगदी मोठ्या कुशलतेने सांभाळतात. अलीकडेच सुरू झालेल्या हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजच्या कामामध्येही त्या जातिनिशी लक्ष देत असतात. नारायण राणे यांच्या खांद्याला खांदा लावून निलमताई नेहमीच त्यांच्यासोबत असतात. सर्व आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांची देखील त्या आस्थेने विचारपूस करतात, त्यामुळेच कर्मचारी वर्गामध्येही त्या खूप प्रिय आहेत.
सर्वसामान्यांच्या परिस्थितीचा कळवळा आणि सर्वांच्याप्रति प्रेम असणाऱ्या प्रेमळ माऊलींचा आज वाढदिवस…. संवाद मिडियाकडून सौ.निलमताई नारायण राणे यांना जन्मदिवसाच्या अगणित शुभेच्छा, त्यांना दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना..