सर्वसामान्य जनतेची लुबाडणूक करणाऱ्या त्या ॲम्बुलन्स चालकाचा ठेका रद्द करण्याची मनसेची मागणी..
राष्ट्रीय आपत्तीच्या काळात सर्वसामान्य जनतेची लुबाडणूक करणाऱ्या दुष्ट प्रवृत्ती वेळीच ठेचण्याची गरज..माजी आमदार परशुराम उपरकर
सिंधुदूर्ग :
Covid-19 या नैसर्गिक विषाणू प्रादुर्भाव आपत्ती काळात गोरगरीब जनतेचे आर्थिक पिळवणूक करून लुबाडणूक करणारे व रुग्णांच्या नातेवाईकांना धमकी देऊन पैसे उकळणारे ॲम्बुलन्स चालकावर गुन्हा दाखल करून त्याचा ठेका रद्द करण्यात यावा अशी मागणी मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी व पोलीस अधीक्षक श्री दाभाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. एम्बुलन्स चालक विशाल जाधव याने लुबाडणूक केलेली अनेक प्रकरणे दैनंदिन उघड होत असून या सर्व प्रकरणांकडे गांभीर्यपूर्वक लक्ष वेधून या दृष्ट व मुजोर ॲम्बुलन्स चालकाकडील शासकीय ठेका तात्काळ रद्दपातल करून गुन्हा दाखल करण्यात यावा.याआधी देखील संबंधित ॲम्बुलन्स चालकाच्या बाबतीत असंख्य तक्रारी प्रशासनाकडे दाखल असून जिल्ह्यातील अनेक ॲम्बुलन्स चालकांनी मनसेचे भेट घेऊन आपल्या व्यथा व गाराने मांडलेली आहेत यामध्ये संबंधित ॲम्बुलन्स चालक जाधव हा अल्प दरात सुविधा देणेस मज्जाव करत असून आपल्या गाडीला इजा पोहचवण्याचे धमकी देतो. तसेच जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांकडून आपल्या मार्फतच आंदोलन सुविधा स्वीकारण्यासाठी दबावतंत्राचा वापर करत असल्याच्या तक्रारी देखील रुग्णांकडून प्राप्त होऊ लागल्या आहेत. अशा मुजोर एम्बुलन्स चालकविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा ठेका रद्द करण्यात यावा अशी मागणी मनसेने दिलेल्या निवेदनात केली आहे.