देवगड
देवगड तालुका चिरेखाण संघटनेच्यावतीने देवगड कोवीड सेंटरसाठी पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले. देवगड तहसिल कार्यालय येथे प्रांताधिकारी सुधीर पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष कोंडके, डॉ.गुरूप्रसाद महेंद्रकर यांच्याकडे पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुपूर्द करण्यात आले.
यावेळी चिरेखाण संघटनेचे अध्यक्ष मिलींद साटम, हेमंत देसाई, एन्.एम्.हिंदळेकर, किरण टेंबुलकर, नितीन जेठे, विनायक आचरेकर, रूपेश खोत, सुरज घाडी आदी पदाधिकारी उपस्थित होते.