You are currently viewing विष प्राशन केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

विष प्राशन केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

कुडाळ

येथील पोलिस स्टेशनचे हवालदार तथा माजी सैनिक अजितकुमार पाटील वय ४२ रा. कुडाळ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना काल रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. त्यांनी काल रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास विषारी द्रव्य प्राशन केले होते. त्यानंतर स्वतः ते कुडाळ येथे प्राथमिक रुग्णालयात दाखल झाले होते. तेथून पोलिस स्टेशन मधील सहकाऱ्यांनी त्यांना अधिक उपचारासाठी पडवे येथील खासगी रुग्णालयात हलविले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांनी नेमकी आत्महत्या का केली? याबाबत कारण कळू शकले नाही. याबाबत कुडाळ पोलीस स्टेशन मध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा