लक्षणे नसताना अनेक जण आले पॉझिटिव्ह रॅपिड टेस्ट मध्ये मोठा घोळ होत असल्याची व्यक्त केली भीती.
कणकवली :
कणकवली तालुक्यात सरसकटपणे काही पॉझिटिव रुग्णांच्या नातेवाईक आणि संपर्कातील लोकांच्या रॅपिड टेस्ट केल्या जात आहेत. या रॅपिड टेस्ट मध्ये लक्षणे नसताना अनेक जण पॉझिटिव्ह येत आहेत,त्यामुळे शस्त्रक्रिया किंवा अत्यंत अत्यावश्यक काळात रॅपिड टेस्ट करावी. अनेक घटनांमध्ये रॅपिड तपासणीत घोळ उघड झाल्याचे दिसून येत असल्याचा आरोप भाजपा सरचिटणीस, माजी सभापती महेश गुरव यांनी केला आहे.
रॅपिड अँटीजन टेस्ट च्या अहवालाबाबत शासनाच्या धोरणाचा अवलंब करावा. ज्या ठिकाणी तातडीने तपासणी करण्याची गरज असेल तर त्याठिकाणी रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्याबाबत दुमत नाही.सद्यस्थितीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रॅपिड अँटीजेन टेस्ट का केल्या जातात…? या टेस्टच्या माध्यमातून आलेल्या अहवाला पैकी 70 टक्के हून अधिक अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याचे दिसते. त्यामुळे या टेस्ट बंद करून आर टी पी सी आर तपासणी करावी अशी मागणी महेश गुरव यांनी केली आहे.
ज्यांना लक्षणे नाही कोणताही त्रास नाही अशा अनेकांचे रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मुळात रॅपिड अँटीजेन टेस्ट अनेक ठिकाणी बंद करण्यात आले आहेत. शाश्वती नसताना या टेस्ट का केल्या जातात..? आय सी एम आर च्या गाइडलाइन्स काय आहेत..? केवळ इमर्जन्सी मध्ये किंवा एखादा रुग्ण गंभीर असेल तरच या टेस्ट कराव्यात. कोवीड संशयित रुग्णांची आर टी पी सी आर टेस्ट करण्यात यावी अशी मागणी महेश गुरव यांनी केली.