दोडामार्ग :
दोडामार्ग तालुक्यात मागील पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विजघर खराडी नदी पात्रात तसेच मुळस हेवाळे येथील काॅजवे ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे या पावसाळ्यात पुन्हा पुराचा धोका शेती बागायती यांना बसणार आहे. तेव्हा जलसंपदा विभागाने ४ दिवसांत गाळ काढण्याचे काम सुरू करावे. नाहीतर तिलारी उपविभागीय कार्यालय येथे उपोषणाला बसण्याचा इशारा तेरवण मेढे ग्रामपंचायत सदस्य मायकल लोबो यांनी दिला आहे. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी नदी पात्रात अनेक ठिकाणी गेल्या दोन महिन्यांपासून तिलारी जलसंपदा विभाग गाळ बाजूला करण्याचे काम करत आहे. बरेच काम पूर्ण झाले आहे, तरी यांञिकी विभाग यांची मशिनरी पोकलेन आजही तेथे वावरत आहेत. एक महिन्यांपासून विजघर घाटीवडे खराडी मुळस हेवाळे येथील काॅजवे जवळ साचलेला गाळ काढून नदी पाञ प्रवाह पूर्ववत करावा अशी मागणी केली जात आहे. पण संबंधित अधिकारी पावसाळा जवळ आला तरी जाणूनबुजून वेळ काढत आहेत.