You are currently viewing मनसेकडून कोविड रुग्णांना प्रोटीन वाढीसाठी उपयुक्त अंडी वाटप..

मनसेकडून कोविड रुग्णांना प्रोटीन वाढीसाठी उपयुक्त अंडी वाटप..

मनसे सरचिटणीस माजी आमदार जीजी उपरकर यांच्या संकल्पनेतून शहर मनसेचा अभिनव उपक्रम..

पुढील 15 दिवस सावंतवाडी शहरातील कोविड सेंटरमध्ये चालणार मनसेचे सकस आहार वाटपअभियान

जिल्ह्यातील दिवसेंदिवस वाढती कोविड रुग्णसंख्या व मृत्यूदर नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत आहे. या कोरोना विषाणू आपत्ती व्यवस्थापनात कोविड रुग्णांनी सकस आहार घेऊन इम्युनिटी वाढवणे हेच प्रमुख आरोग्य धोरण असल्याने सावंतवाडी शहर मनसेने पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या सूचनेनुसार पुढील 15 दिवस कोविड रुग्णांना प्रोटीन वाढीसाठी उपयुक्त सकस आहार पुरवण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. त्याअनुषंगाने आज दि.23 मे 2021 रोजीपासून सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले कोविड सेंटर ठिकाणी तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उकडलेली अंडी तसेच फळे व विविध प्रकारचा आहार रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात आजपासून मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे यावेळी माजी जिल्हाउपाध्यक्ष ऍड अनिल केसरकर शहराध्यक्ष आशिष सुभेदार उपशहर अध्यक्ष शुभम सावंत देवेंद्र कदम मनविसे उपतालुका अध्यक्ष संकेत मयेकर अनुप सोनी आदी उपस्थित

प्रतिक्रिया व्यक्त करा