ओढ पंढरीची
(मुक्तरचना)
सांगा ! जावू कशाला मी पंढरपुरी
मज नित्य भेटतो , इथेच हा श्रीहरी
माझ्या , मळ्याच्याच या बांधावरी
नाहतो पाटाच्या पाण्यातुनी श्रीहरी ।।.१।।
भिजल्या वावरी दरवळता मृदगंध
कीर्तनी रंगती ! सकल संत अभंग
माझ्या झोपडीत घुमता टाळमृदुंग
चिपळयासंगे नाचे , शिवारी श्रीहरी ।।२।।
शेतातुनी माझिया, दिंडीची ती वाट
थिरकता पाऊले , शेतात वैष्णवांची
प्रत्येक पाऊलांना ती ओढ़ पंढरीची
बघा शेतामंदी माझ्या ! उभा श्रीहरी ।।३।।
भास मज क्षणोक्षणी विठुमाऊलीचा
मातीसही गंध सावळ्या विश्वंभराचा
सदा नांदतो इथे ! कृपावंत हा माझा
हीच माझी पंढरी ! हाच माझा श्रीहरी ।।४।।
*©वि.ग.सातपुते.(भावकवी)*
*📞9766544908*
खूपच भावस्पर्शी, 🙏🙏