कणकवलीतील भाजी विक्रेते व विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचा दिला इशारा
कणकवली :
पोलिसांनी आज शहरात झालेली गर्दी कमी करण्यासाठी कारवाई सुरू केली. ११ वा. नंतर सुरू असलेली सर्व दुकाने बंद करण्यास भाग पाडले. ११ वा नंतर सुरू असलेली दोन भाजी विक्रेत्यांची भाजी पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यानंतर नगरपंचायत कर्मचाऱ्यांकडून त्या दोन भाजी विक्रेत्यांना प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे दंड करण्यात आला. तर शहरात विना मास्क फिरत असणाऱ्या दोघांवर पोलिसांनी प्रत्येकी दोनशे रुपये या प्रमाणे कारवाई केली. पोलीस कारवाई मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांच्यासह पोलिस हवालदार गुरव वाहतूक, पोलीस चंद्रकांत माने , होमगार्ड आदींचा सहभाग होता. तर नगरपंचायतीच्या पथकामध्ये रवी महाडेश्वर, प्रशांत राणे, संतोष राणे, रमेश कदम आदींनी सहभाग घेतला. आज सकाळीच नगरपंचायत कर्मचारी व मुख्याधिकार्यांनी सात वाजता शहरात आढावा घेतला. तसेच यापुढेही ही कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिस व नगरपंचायत कडून सांगण्यात आले.