गावात टँकरने पाणी पुरवठा; मोफत ताडपत्री पुरवठा
मालवण
तौक्ती चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या मालवण तालुक्यातील देवबाग गावच्या मदतीसाठी भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे धावून आले आहेत. शुक्रवारी श्री. राणेंच्या वतीने देवबाग मध्ये टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात आला. शनिवारी देखील याठिकाणी पाणी पुरवठा केला जाणार असून गावात मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाल्याने ग्रामस्थांना मोफत ताडपत्री वाटप केले जाणार आहे.
कोकणात ज्या ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती ओढवते, त्यावेळी राणे कुटुंबीय मदतीसाठी नेहमीच पुढे असते, याची प्रचिती वारंवार दिसून येते. तौक्ती चक्रीवादळ प्रसंगात देखील हेच समोर आले आहे. मालवण तालुक्यातील देवबाग मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून माजी खासदार निलेश राणे यांच्या वतीने शुक्रवारी गावात टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. यावेळी भाई मांजरेकर, मंदार लुडबे, गणेश केळुसकर, संकेत राऊळ, गणेश मोंडकर, नाना तांडेल, दत्ता चोपडेकर, बाबू कासवकर, जिजी कांदळगावकर, पंकज मालंडकर आदी उपस्थित होते. शनिवारी निलेश राणे यांच्या माध्यमातून देवबाग मध्ये मोफत ताडपत्री वाटप करण्यात येणार आहे.