You are currently viewing डीकेटीईमध्ये फेसमास्क डिटेक्शनची निर्मिती..

डीकेटीईमध्ये फेसमास्क डिटेक्शनची निर्मिती..

विनामास्क फिरणाऱ्यांना प्रणालीद्वारे शोधण्यास होणार मदत..

चौकुळ येथील शांभवी पनवेलकर या मुलीचा संशोधनात हात..

सावंतवाडी

इचलकरंजी येथील डीकेटीई कॉम्प्युटर विभागातील अंतिम वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थिनींनी ‘फेसमास्क डिटेक्शन सिस्टीम’ हा अभिनव प्रकल्प विकसित केला आहे. डीकेटीईमधील विद्यार्थी गेल्या वर्षापासून कोरोनापासून प्रतिबंधक उपाय शोधण्यासाठी नावीन्यपूर्ण प्रकल्प हाती घेऊन नवनवीन संशोधन करीत आहेत.विशेष म्हणजे या टीम मध्ये चौकुळ येथील उल्हास पनवेलकर यांची मुलगी शांभवी पनवेलकर हिचा समावेश आहे.

स्नेहल मिरजे, मृदुला खोत, शांभवी पनवेलकर, रविना निंबाळकर व श्वेता कोळी यांनी ”आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डीप लर्निंग’ या तंत्रज्ञानाचा वापर करून फेसमास्क डिटेक्शन’ हा प्रकल्प हाती घेतला. या डीकेटीईच्या विद्यार्थिनींनी फेसमास्क डिटेक्शन सिस्टीम विकसित केली आहे.

बसस्थानक, रेल्वे स्टेशन व सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी लोकांच्या चेहऱ्यावरील मास्क स्वयंचलितपणे शोधण्यासाठी होऊ शकतो. विद्यार्थिनींना प्रा. एस. एस. दरबस्तवार, प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, डॉ. डी. व्ही. कोदवडे यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रकल्पामध्ये एखाद्याने मास्क परिधान केला आहे की नाही, हे तपासण्यासाठी मॉड्युल विकसित केले आहे. मास्क परिधान केला नसेल, त्यावेळी विशिष्ट असा आवाज करणारी प्रणाली विकसित केली आहे.

या प्रणालीचा वापर मोठ्या कंपन्या,बसस्थानक, रेल्वे स्टेशन व सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी लोकांच्या चेहऱ्यावरील मास्क स्वयंचलितपणे शोधण्यासाठी होऊ शकतो. विद्यार्थिनींना प्रा. एस. एस. दरबस्तवार, प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, डॉ. डी. व्ही. कोदवडे यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा