एक झुरका सकाळचा,
अंग अंग ताजेतवाने करतो.
चहाचा स्वाद जिभेवरून,
घसा शेकत पोटात जीरतो.
अंगात नसता त्राण उठण्या,
चहाचा वास हवेत पसरतो.
नाकपुड्यांची तल्लप भागते,
चहाच्या पिता त्रास विसरतो.
भूक पोटा लागली असता,
चहा पिऊनी भूक शमवतो.
गारठलं अंग गारठ्याने तरी,
चहा अंतरबाह्य शेकवतो.
चहा म्हणजे झोपेवरचा,
अगदी रामबाण इलाज.
घरात असो वा टपरीवर,
चहा प्यायला न वाटे लाज.
चहा पिण्या कधी कुणा,
न लागे कोणतेही कारण.
मित्र सखे सोबती असता,
हमखास होते चहाचे स्मरण.
(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी.