शिक्षक भारतीने दाखविली पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवण ही शैक्षणिक उपक्रम व सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर राहणारी शिक्षक संघटना असून गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये अडकलेले परप्रांतीय कामगार व गरजू जनता यांना सुमारे सव्वा लाख किमतीचे अन्नधान्य व आवश्यक साम्रुगी वाटप केल्यानंतर आज प्राथमिक शिक्षक भारती मालवणने पुन्हा सामाजिक बांधिलकी जोपासली.
सध्याच्या घडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे संकट गडद होत आहे.अनेक ठिकाणी रूग्णांना ऑक्सीजनच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे.याचे महत्त्व लक्षात घेवून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवणने सर्व सभासदांच्या सहकार्यातून कोवीड केअर सेंटर कुंभारमाठ मालवणला ऑक्सीजन काँन्सट्रेटर मशीन भेट म्हणून जिल्हाध्यक्ष श्री.संतोष पाताडे यांच्याहस्ते तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे प्रदान केली.
यावेळी आरोग्य विस्तार अधिकारी श्री. सुरज बांगर, गटशिक्षणाधिकारी श्री.संजय माने, शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष श्री.संतोष पाताडे, आरोग्य सहायक श्री.संजय नाईक, हेमदिप पाताडे, शिक्षक भारती तालुकाध्यक्ष संतोष कोचरेकर,सचिव संतोष परब, कृष्णा कालकुंद्रिकर, विनेश जाधव, संजय जाधव, तुकाराम खिल्लारे, संजय परुळेकर उपस्थित होते.
सद्यस्थितीत कोवीड केअर सेंटर कुंभारमाठ मालवणला ऑक्सीजन काँन्सट्रेटर मशीनची अत्यावश्यक गरज होती. शिक्षक भारती मालवणने सामाजिक बांधिलकी दाखवत योग्य वेळी तातडीने सदर मशिन प्रदान केल्यामुळे रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे. अत्यावश्यक वेळी तातडीने मदत केल्याबद्दल प्राथमिक शिक्षक भारती संघटनेचे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत.