कोरोना काळात प्रशासनाला पूर्ण सहकार्य करणार नवलराज काळे यांचा तहसीलदार रामदास झळके यांना शब्द
मात्र लेखी स्वरुपात देलेल्या आश्वासनाची अमंलबजावनी न झाल्यास जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या विरोधात अमरण उपोषण करण्याचा काळे यांनी दिला इशारा.
वैभववाडी
13 तारखेला व्हाट्सअप मेल द्वारे व 14 तारखेला तहसीलदार कार्यालयाला प्रत्यक्ष भेटून ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी सडुरे प्रा.आ.केंद्र मधे कायम स्वरुपी रुग्णवाहिका व COVID-19 लसीकरण चालू करण्याबाबत मागील केलेल्या मागण्यांचा संदर्भ देत निवेदन दिले होते. तसेच यावेळी आठ दिवसांमध्ये या मागण्या मान्य न झाल्यास 21 मे 2021 रोजी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. या निवेदनाचा संदर्भ देत तालुक्याचे तहसीलदार रामदास झळके यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांना, जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे सदर मागणीची पूर्तता करण्यासाठी 18 मे 2021 रोजी पत्र व्यवहार केला होता. 20 मे 2021 रोजी तालुका आरोग्य विभागाच्या अधिकारी यांच्या सोबत श्री काळे यांची तहसीलदार यांच्या समावेत एक बैठक पार पडली. जिल्हा वरून रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यास प्राधान्य क्रमाने प्रा. आ केंद्र सडूरे ला उपलब्ध करून देऊ असे उपस्थित आरोग्य विभागाच्या अधिकारी यांनी सांगितले.तूर्तास 102, 108 सेवा चालू आहे अडचण असल्यास प्रशासनाशी संपर्क साधा, नवीन रुग्णवाहिका येऊ पर्यंत पंचक्रोशीत 102,108 वर सेवा पुरवू.पालकमंत्री उदय सामंत यांनी आढावा बैठकीत सडुरे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली आहे.रुग्ण वाहिका आपल्यास नक्की मिळेल . तसेच Covid 19 लसीकरण बाबत बोलत असताना आरोग्य विभागचे अधिकारी बोलले सद्या प्रा.आ. केंद्र सडूरे जागेची अडचण असलेमुळे प्रा. आ केंद्र सडूरे मार्फत विकास विद्यालय सडूरे अरुळे या शाळेमध्ये तालुक्यात लसीचा पहिला डोस उपलब्ध झाल्यावर प्राधान्याने लसीकरण केंद्र चालू करूया अशी चर्चा करण्यात आली. आम्ही सर्व परीने आपल्या मागण्या पूर्ण करू असे तालुका आरोग्य प्रशासनाच्या अधिकारी यांनी असे सांगत काळे यांना उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली.यावेळी काळे यांनी माझ्या मागण्या जनतेच्या सेवेसाठी आहेत.त्यावर आपण प्रशासन सकारात्मक भूमिका दाखवत असाल तर माझे आपल्याला पूर्ण पने सहकार्य असेल. सदर मागणी पूर्ण होणे बाबत आरोग्य विभागाने लेखी स्वरूपात मला व जनतेला आश्वसीत करावे त्यानंतर उपोषण मागे घेण्याचा विचार करू असे काळे यांनी सांगितले. यावेळी तालुका तहसीलदार रामदास झळके , आरोग्य विभागाचे अधिकारी श्री चव्हाण उपस्थित होते. त्याच्यामध्ये तहसीलदार रामदास झळके साहेब यांची शिष्टाई ला यश आले.
अन् अखेर 20-05-2021 रोजी रात्री उशिरा तालुका आरोग्य विभागाकडून काळे यांनी केलेल्या मागण्या मान्य करण्याचे लेखी स्वरूपात आश्वासन दिले.
आरोग्य विभागानी दिलेल्या लेखी स्वरूपाचे आश्वासन पूर्ण होईल त्या दिशेने त्यांची वाटचाल असावी, मी
पंचक्रोशीतील जनतेसाठी केलेल्या मागण्या पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. वैभववाडी तालुका आरोग्य विभागाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर तसेच वैभववाडी तालुक्याचे तहसीलदार या नात्याने तुम्ही स्वतः ,पोलीस निरीक्षक अतुल जाधव सर व त्यांचे सहकारी श्री भोवड आपण सर्वांनी केलेल्या शिष्टाईचा मान राखून आज 21 मे 2021 रोजी मी करत असलेले एक दिवसीय लाक्षणिक उपोषण तूर्तास स्थगित करीत आहे. लेखी स्वरूपात दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आपल्या माध्यमातून सहकार्य मिळावे. माझ्याकडून प्रशासनाला शंभर टक्के लागेल ते सहकार्य मिळेल अशी आपणास आश्वासन देतो.मात्र तालुका आरोग्य प्रशासनाकडून लेखी स्वरुपात देलेल्या आश्वासनाची अमंलबजावनी न झाल्यास जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या विरोधात अमरण उपोषण करण्याचा सडूरे शिराळे ग्रामपंचायतचे सदस्य श्री नवलराज विजयसिंह काळे यांनी आज निवेदनाद्वारे इशारा दिला. सदर निवेदनाच्या प्रती तालुका तहसीलदार यांच्या सहीत पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी, वैभववाडी तालुका आरोग्य अधिकारी, वैभववाडी तालुका पोलीस निरीक्षक, यांना मेल द्वारे व प्रत्यक्ष भेटून आज रोजी दिले आहे.