सिंधुदूर्ग :
मागील ३ दिवसांपासून कोकण दौऱ्यावर असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड आणि मालवण तालुक्यातील चक्रीवादळाने नुकसानग्रस्त झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी आमदार नितेश राणे यांनी विरोधी पक्ष नेत्यांना जिल्ह्यातील नुकसानीच्या वस्तुस्थितीची माहिती दिली.
आंबा बागायती, मच्छीमारांचे या वादळात मोठे नुकसान झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यांनी आपद्ग्रस्तांची आपुलकीने विचारपूस करत त्यांना धीर दिला. भाजपा आपल्या पाठीशी आहे अशी ग्वाही दिली.
यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड, माजी आमदार अजित गोगटे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, बाळा खडपे, जयदेव कदम आदी उपस्थित होते.