डॉ. जयेंद्र परुळेकर यांचा सवाल…
सिंधुदुर्गासह संपूर्ण कोकणाला “तौक्ते” चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला आहे.कोकणची जनता या देशाची नागरिक नाही का?
देशाचे पंतप्रधान हे काय गुजरातचेच पंतप्रधान आहेत का?
हा दुजाभाव का ? असा सवाल शिवसेना प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे.
कोकणातील अनेक घरांचं, मालमत्तेचं मोठं नुकसान जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात झालेलं आहे.
अशावेळी देशाचे पंतप्रधान तातडीने फक्त गुजरात दौरा करतात आणि गुजरातला एक हजार कोटी रुपयांची भरीव मदत जाहीर करतात पण कोकणात येत नाहीत हे आश्चर्यकारक आणि दुर्दैवी आहे.
कोकणची जनता या देशाची नागरिक नाही का?
देशाचे पंतप्रधान हे काय गुजरातचेच पंतप्रधान आहेत का?
हा दुजाभाव का ?
जिल्ह्यातील आणि राज्यातील भाजप नेते पंतप्रधानांना हा प्रश्न विचारायचं धाडस आता तरी दाखवतील का?
राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते कोकणच्या दौऱ्यावर आहेत,आज उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील येतील.त्यांनी सर्व प्रथम पंतप्रधान कोकणात का आले नाहीत? आणि कोकणाला केंद्र सरकार किती मदत करणार?
या प्रश्नांची उत्तरे कोकणी जनतेला द्यावीत.
फक्त राजकारण करण्यासाठी दौरे करणे याचा कोकणी जनतेला कंटाळा आलेला आहे.