You are currently viewing 21 रोजी स्वयंरोजगार विषयी ऑनलाईन मार्गदर्शन सत्र

21 रोजी स्वयंरोजगार विषयी ऑनलाईन मार्गदर्शन सत्र

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग तर्फे शुक्रवार दिनांक 21 मे 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत स्वयंरोजगार मार्गदर्शन तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेची माहिती याविषयी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या मार्गदर्शन सत्रामध्ये सुनिल पवार, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग आणि सिद्धेश पवार, जिल्हा समन्वयक, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ हे मार्गदर्शन करणार आहेत. सदर मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी Google Meet link – https://meet.google.com/khr-ybti-swh या लिंकवर जाऊन कनेक्ट व्हावे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी या मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन सुनिल पवार, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 19 =