देवगड :
तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड बंदर येथे प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी आपतग्रस्तांचा व मच्छिमार बांधवांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. आपतग्रस्त कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत करण्याचे निर्देश ना. उदय सामंत ह्यांनी प्रशासनास दिले. त्यावेळी खासदार विनायक राऊत, प्रांत व संबंधित अधिकारी उपस्थित होते.