You are currently viewing मच्छिमारांनी सुनावले पालकमंत्र्यांना खडे बोल..

मच्छिमारांनी सुनावले पालकमंत्र्यांना खडे बोल..

देवगड :

 

सिंधुदुर्गचे पालकमंत्री, उदय सामंत ‘तौत्के’ चक्रीवादळाची पाहणी करणाऱ्यासाठी देवगड बंदर गेले होते. या वेळी त्यांना देवगड बंदर येथील मच्छीमारांच्या रोषाला सामोरे जावे लागले. संतप्त झालेल्या मच्छिमारांनी पालकमंत्र्यांना खडे बोल सुनावत चांगलेच फैलावर घेतले. “जेव्हा आमचे लोक पाण्यात बुडत होते तेव्हा तुमची यंत्रणा काय करत होती ?” तेव्हा मदतीला धावले असता तर आज मच्छीमारांचे जीव वाचले असते. आता पाहणी कसली करता अशा शब्दात मच्छिमारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.संतप्त मच्छीमारांच्या प्रश्नांवर काहीच उत्तर देऊ शकले नाहीत. अखेर त्यांना पाहणीचे सोपस्कार करून परतावे लागले.

 

आज पालकमंत्री उदय सामंत यांनी देवगड तालुक्यात ‘तौत्के’ चक्रीवादळाच्या पाहणीचा दौरा  केला. यावेळी बंदर भागाची पाहणी करतांना उपस्थित मच्छिमार संतापले. चक्रीवादळ येणार होते हे माहीत असतांना आपत्कालीन परिस्थितीचे काहीही नियोजन नव्हते. जेव्हा आम्हाला मदतीची गरज होती तेव्हा कोणतीच यंत्रणा सज्ज नव्हती, मच्छिमार वाहून गेले. तेव्हा आमदार नितेश राणे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना संपर्क साधल्यानंतर कोस्टल खात्याची मदत मिळाली. हीच मदत पूर्व नियोजित सज्ज असती तर दोन लोक बुडून मेले नसते. तर दोन वादळात बेपत्ता झाले नसते. अश्या शब्दात पालकमंत्री उदय सामंत यांना खडे बोल सुनावले. अपयशाचा पाढा मच्छिमारांनी वाचताच सर्वच निरुत्तर झाले व तेथून दुसरीकडे रवाना झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा