सिंधुदुर्गनगरी
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या दिनांक 19 मे 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमणे आहे.
सकाळी 9.30 वा. वैभववाडी तहसिलदार यांच्या समवेत तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या वैभववाडी तालुक्यातील नाधवडे, सांगुळवाडी, सडुरे, कुर्ली या नुकसानग्रस्त भागाची पाहाणी, सकाळी 10.30 वा. वैभववाडी येथून मोटारीने देवगडकडे प्रयाण, सकाळी 11.30 वा. देवगड तहसिलदार यांच्या समवेत तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या देवगड तालुक्यातील देवगड बंदर, कुणकेश्वर, मिठबांव(तांबळडेग) या नुकसानग्रस्त भागाची पाहणी, दुपारी 12.30 वा. देवगड येथून मोटारीने मालवणकडे प्रयाण, दुपारी 1.45 वा. मालवण तहसिलदार यांच्या समवेत तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मालवण तालुक्यातील तळाशील – मालवण शहर या नुकसानग्रस्त भागाची पाहणी, दुपारी 2.45 वा. मालवण येथून मोटारीने ओरोस, सिंधुदुर्गनगरीकडे प्रयाण, दुपारी 3.15 ते 4.15 वा. ओरोस येथे आगमन व राखीव, दुपारी 4.15 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी यांच्या समवेत तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठक, सायं. 5.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषद, सायं. 6.00 वा. ओरोस, सिंधुदुर्गनगरी येथून मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण.