You are currently viewing पाऊसाची रिमझिम

पाऊसाची रिमझिम

अस्ताचलाच्या , वेदिवरती..
रवीराजा , घुटमळला होता..
गुलाबरंगी , क्षितीजावरती..
तो पाऊस रिमझिमला होता..।।..१

लेवुनिया भरजरी पितांबर..
सावळाच ! मेघडंबरी उभा..
मंजूळ मंजुळ , वेणु चराचरी..
तो पाऊस सुखावलेला होता..।।. .२

दिवेलागण ! तिन्हीसांजली..
परवचा ! संस्कारी सोज्वळ..
मनांतरी ! सात्विक पुण्यदा..
तो पाऊस ! स्वर्गस्पर्शी होता..।।..३

बिलगता ! संध्या यामिनीला..
मिठीत ! गुंतलेली चंद्रचकोरी..
नीरव,निःशब्दी श्वास सुखाचा..
तो पाऊस , धुंद बरसत होता..।।..४
🌧🌧🌧🌧🌧🌧🌧🌧
*रचना क्र. ६४ ©️ वि.ग.सातपुते.(भावकवी).*
📞 *9766544908*
दिनांक :- १७ – ५ – २०२१ .

प्रतिक्रिया व्यक्त करा