तौक्ती वादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी विद्युत व्यवस्था कोलमंडलेली आहे. पोल पडले आहेत, वाहिन्या तुटल्या आहेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. व जिल्ह्यातील विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे. याची दखल घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांनी विद्युत अभियंता व विद्युत कामगार यांच्या १० टीम म्हणजे १५० माणसे मंडणगड, दापोली व मुंबई येथून उपलब्ध करून दिलेली आहेत. या टीम आज संध्याकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होतील व उद्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी माहिती खासदार मा. विनायकजी राऊत यांनी शिवसेना तालुका संघटक श्री बबन बोभाटे याना दूरध्वनी द्वारे दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्युत व्यवस्थेकरिता विद्युत विभागाच्या १० टीम आज होणार सिंधुदुर्गात दाखल…
- Post published:मे 17, 2021
- Post category:बातम्या / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments
You Might Also Like
सावंतवाडीतून बेपत्ता झालेला “तो” मुलगा कोल्हापुर-नृसिंहवाडी येथे सापडला…
भटवाडी येथे सुरक्षा रक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू…
सावंतवाडी तालुक्यातील गौण खनिज, बोअर ब्लास्टींग बंद करा; जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना निवेदन..
