प्रशासनाकडून घेतला नुकसानीचा आढावा!
कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात चक्रीवादळामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीची माहिती प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील मच्छीमार, शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घर गोठे, यासह अन्य इमारती व शेती-बागायती यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंदर्भात प्रशासनाच्या आम्ही संपर्कात असून, जिल्ह्यातील नुकसानग्रस्त नागरिकांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सरकारजवळ पाठपुरावा करू. अशी ग्वाही आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून दिली आहे.