बांदा
गेल्या वर्षभरापासून कोविड १९च्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी प्रथम एज्युकेशन संस्थेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. प्रथम संस्थेचा वतीने प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर व विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर यांच्या मार्फत शाळे बाहेरची शाळा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी अभ्यासक्रमा संबंधित गप्पा मारून या भागाचे प्रसारण राज्यातील विद्यार्थ्यांपर्यंत प्रसारित करण्यात येत आहे. रेडिओच्या नागपूर आकाशवाणीवरून प्रसारित होणार्या १४४व्या भागासाठी बांदा नं.१ केंद्रशाळेत पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेऊन आठवीसाठी पुढील शिक्षणासाठी जाणाऱ्या सिमरन सुधीर तेंडोलकर व तिची आई सुवर्णा सुधीर तेंडोलकर यांच्याशी नागपूर आकाशवाणीवरून निवेदिका आर. जे.रेशमा यांनी श्वास घेण्यासाठी मानवी शरीरातील कोणकोणती इंद्रिये कार्य करतात या अभ्यासक्रमातील भागाचे मुलाखतीद्वारा आकाशवाणी केंद्रावरून राज्यभर प्रसारण होणार आहे. या विद्यार्थीनीला वर्गशिक्षिका उर्मिला मोर्ये, उपशिक्षक जे. डी. पाटील,रंगनाथ परब, शुभेच्छा सावंत, रसिका मालवणकर, जागृती धुरी, वंदना शितोळे, प्राजक्ता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. बांदा शाळेच्या विद्यार्थ्यांनीची निवड आकाशवाणीवर झाल्याबद्दल मुख्याध्यापक सरोज नाईक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, बांदा सरपंच अक्रम खान, केंद्रप्रमुख संदिप गवस, विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, प्रथम संस्थेच्या कोकण विभागीय समन्वयक ऋतुजा पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
कोवीड १९च्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरीही प्रथम एज्युकेशन संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचे शिकणे चालू ठेवणेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना व्हॉट्स अप व आकाशवाणीच्या माध्यमातून शिक्षण मिळत असल्याबद्दल संस्थेचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
वा कोतूकास्पद. अभिनंदन सिमरनचे.