कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात चक्रीवादळाने हाहाकार माजवला असल्याने जिल्ह्यात घरे, गोठे व अनेक इमारतींची छपरे उडून जात मोठी पडझड झाली आहे. त्यामुळे या वादळाचा प्रभाव कमी झाल्यावर या सर्व इमारती, घरे, गोठे आदींची दुरुस्ती करण्या करिता जिल्ह्यातील ज्या दुकानांमध्ये ताडपत्री, प्लास्टिक कागद, खिळे, कुऱ्हाड, बांबू तसेच दुरुस्ती साठी लागणारे आवश्यक साहित्य असणारी दुकाने आज पासून 20 मेपर्यंत पूर्णवेळ उघडे ठेवण्यास सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. याबाबतचे अधिकृत आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पारित केले आहेत.