You are currently viewing लोरे येथे चक्रीवादळाने घरे व विद्युत पोल पडून मोठे नुकसान

लोरे येथे चक्रीवादळाने घरे व विद्युत पोल पडून मोठे नुकसान

चक्रीवादळाची लाट जाईपर्यंत जनतेने सुरक्षित ठिकाणी रहावे.- लोरे ग्रा.प. सदस्य रितेश मेस्त्री

वैभववाडी

सद्या चालू असलेल्या चक्रीवादळाचा तडका लोरे गावाला बसला आहे.अनेकांची घरांची कौले,पत्रे उडून गेल्याचे चित्र दिसत आहे तसेच काही आंबा काजू बागायतदारांचे कलम झाडे , फणस पडलेले आहेत. त्याच प्रमाणे विद्युत पोल पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

चक्रीवादळाच्या सुरुवातीला ही नुकसान होणे गंभीर बाब आहे.या चक्रीवादळाचा तडाखा आज व उद्या 2 दिवस जास्त प्रमाणात बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहेत. चक्रीवादळा सहीत विजेच्या कडकड्यांसह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनाम्याप्रमाणे करून नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शासनदरबारी विशेष पाठपुरावा करू. पण सद्या गावतील जनतेने चक्रीवादळाचा धोका जाई पर्यंत प्रशासनाच्या सूचनेचे पालन करून सुरक्षित ठिकाणी रहावे असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा लोरे जिल्हा परिषद शक्ती केंद्र प्रमुख रितेश मेस्त्री यांनी लोरे सहीत आजूबाजूच्या गावातील जनतेला केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा