सिंधुनगरी
चक्रीवादळाच्या भीतीचे सावट पण त्यातच सिंधुनगरी येथे महामार्गावर झालेल्या लक्झरी बसच्या अपघातांमुळे ओरोसवाशीय भयभीत झाले. मुंबईकडून गोव्याकडे जाणार्या लक्झरी बसने ओरोस सावंतवाडा येथील मंगेश महादेव सावंत ( ४५) या पादचाऱ्यांला धडक देत त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर ही बस पलटी झाली. ओरोस भवानी मंदिरासमोर स. ७.४० वाजता हा अपघात झाला. लक्झरी बसमधील सुमारे पाच प्रवाशी जखमी झाले असून त्यांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मंगेश महादेव सावंत हे नेहमीप्रमाणे दूध देण्यासाठी सर्व्हिस रोडने शेजारी कुटूंबाकडे चालले होते त्याचदरम्यान मुंबईकडून गोव्याकडे जाणारी भरधाव लक्झरी बस महामार्गावर स्लीप होऊन चालकाचा बसवरील ताबा सुटला. महामार्गावरील लोखंडी कठडे तोडून ही बस सर्व्हिस रोडमध्ये घुसली. व सर्व्हिस रोडवरून जाणार्या दुर्दैव मंगेश सावंत यांना धडकली. बसच्या धडकेने मंगेश सावंत फेकले जाऊन ते जागीच गतप्राण झाले. व सदर लक्झरी बस पलटी झाली. महामार्गावरील सुमारे दोनशे फूट लोखंडी रेलिंग तोडत ही बस सर्व्हिस सोडला घुसून पुन्हा मुंबईच्या दिशेने तोंड करून पलटी झाल्याने फार मोठा आवाज झाला महामार्गावरील ओरोस सावंतवाडा वसाहतीत घबराट पसरली.
दुर्दैवी मंगेश सावंत हे ओरास सावंतवाडा येथील रहिवाशी असून शेतकरी होते. त्यांच्या पश्चात चार मुले पत्नी असा परिवार आहे. कुटुंबातील एकमेव कर्त्या पुरुषावर काळाने घाला घातल्याने हे कुटूंब पोरके झाले आहे. शांत मनमिळावू स्वभावाचे मंगेश सावंत यांच्या दुर्दैवी निधनामुळे ओरोस परिसरात शोककळा पसरली आहे.