You are currently viewing गुन्हा

गुन्हा

एक साद तुला घातली,
वळूनही नाही तू पाहिले.
तुझ्या एका कटाक्षासाठी,
सारे जीवन मी वाहिले.

चालता तू पुढे पुढे,
मी शीळ तुला घाली.
भाव चेहऱ्यावर न दिसे,
हास्य खुले तुझ्या गाली.

अबोल तुझे शब्द ते,
कधी न कळले मज.
घात नजरेने केला होता,
मन भोगतो आहे आज.

हृदयातले प्रेम तुझ्या,
ओठी कधीही न आले.
काय गुन्हा होता माझा,
का प्रेम प्रेमातच हरले.

(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी.

प्रतिक्रिया व्यक्त करा