कोरोनात व्यापाऱ्यांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे.
वैभववाडी :
वैभववाडी बाजारपेठ पुन्हा बंद होणार या निव्वळ अफवा आहेत. अफवांवर व्यापारी व ग्राहकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन वैभववाडी व्यापारी मंडळ अध्यक्ष मनोज सावंत यांनी केले आहे. शहरात कोरोना रुग्ण वाढल्याने आरोग्य प्रशासनाने संपूर्ण बाजारपेठ कंटेन्मेन झोन जाहीर केला होता.
या काळात सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला चांगले सहकार्य केले आहे. कंटेन्मेन झोन कालावधी पुर्ण झाल्यानंतर बुधवार दि. 9 रोजी पासून बाजारपेठ पुन्हा सुरू झाली आहे. काही जण पुन्हा बाजारपेठ बंद होणार अशा अफवा पसरवित आहेत. बंदचे कोणतेही आदेश प्रशासनाकडून प्राप्त झाले नाहीत. आदेश आलेच तर ते तात्काळ कळविले जातील.
सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरू ठेवावीत. शासनाचे आदेशाचे पालन करावे. मास्क शिवाय ग्राहक दुकानात आल्यास त्यांना मास्क लावण्याची विनंती करावी. सोशल डिस्टन्सचे सर्वांनी तंतोतंत पालन करावे असे मनोज सावंत यांनी सांगितले आहे.