You are currently viewing कोकणातील कमी पटांच्या शाळेत शारीरिक शिक्षण शिक्षकपद इतिहासजमा होणार

कोकणातील कमी पटांच्या शाळेत शारीरिक शिक्षण शिक्षकपद इतिहासजमा होणार

क्रीडा शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांसमोर मांडल्या संच मान्यतात्रुटींची व्यथा…

कासार्डे :

नवीन संचमान्यतेत शिरीरिक शिक्षण शिक्षकपद हे प्रत्येक शाळेतील आठव्या शिक्षकपदानंतर सुचविण्यात आले आहे. त्याऐवजी हे शिक्षकपद पाचव्या पदानंतर मिळावे अशी मागणी करीत, कोकणातील विविध जिल्ह्यांत भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता या ठिकाणच्या शाळेत पटसंख्या खुपचं कमी असल्याने यापुढे या शाळेतील शारीरिक शिक्षण शिक्षक पद हे इतिहासजमा होवुन जाणार असल्याचे नमुद केलेले निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघच्यावतीने जिल्हा अध्यक्ष बयाजी बुराण, राज्य समन्वयक दत्तात्रय मारकड यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे कोकणातील तसेच जिल्ह्यातील शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या व्यथा मांडल्या आहेत.

पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात कोकणपट्ट्याती बहुतेक शाळेत कमीपट संख्याच्या असल्याने शारीरिक शिक्षण शिक्षकांचा गंभीर प्रश्र्न निर्माण होण्याची शक्यता आहे ही बाब पदाधिकाऱ्यांनी मंत्रीमहोदयांच्या निदर्शनास आणून दिली आहे. महासंघाने दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, ग्रामीण भागातील शाळांसाठी PTR कमी करण्यात येऊन गोर-गरीबांच्या शिक्षणाची दारे शाळां चालू ठेऊन उघडी ठेवावीत. नवीन संचमान्यता निकषात शारीरिक शिक्षण शिक्षक पद हे 8 वे (246-280) दरम्यान दर्शविले आहे.

28 ऑगस्ट 2015 च्या शासन निर्णयात 2.3.5 मध्ये एखादया शाळेत तीन पेक्षा अधिक शिक्षक मंजूर झाल्यास … इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, मराठी, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयांची शिक्षक संख्या समतोल ठेऊन पुढील पदे मंजूर करण्यासंदर्भात आदेशित आहे तरी शारीरिक शिक्षणाचे देय पद हे 5 वे (176) ला मंजूर करण्यात यावे. शारीरिक शिक्षण शिक्षक दुसरे देय पद हे 16 ते 32 शिक्षक संख्या दरम्यान देय असावे.

फीट इंडिया मूव्हमेंट साठी शिक्षकाचे वर्कलोड वाढणार असल्याने अतिरीक्त शारीरिक शिक्षकाची गरज भासणार आहे, त्यामुळे 16 शिक्षक पद संख्येस दुसरा शारीरिक शिक्षक मिळावा.

बायफोकल पद्धतीने कार्यभार धरावा-

बायफोकल पद्धतीने कार्यभार धरावा व शिक्षक निर्धारण व्हावे- 14 मे 1987 च्या शासन निर्णया प्रमाणे शारीरि शिक्षणा 50% व पदवी विषयाचा अथवा मेथडचा 50% कार्यभार पकडून बी एड समकक्ष शारीरिक शिक्षण शिक्षक नियुक्ती करण्यात यावी.

प्रत्येक शाळेत किमान एक शारीरिक शिक्षण शिक्षक असावा

प्रत्येक शाळेत किमान एक शारीरिक शिक्षण शिक्षक असावा. सदरील शासन निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी व्हावी. बायफोकल पद्धतीने कार्यभार धरून शिक्षक भरती व्हावी.

अतिरीक्त सरावाची वेळ हा कार्यभारात धरण्यात यावा

अतिरीक्त वेळ कार्यभारात धरण्यात यावा – शारीरिक शिक्षण शिक्षक स्पर्धेच्या तयारीसाठी शाळे व्यतिरिक्तचा वेळ देत असल्याने या अतिरीक्त वेळेचा समावेश कार्यभारात पकडण्यात यावा.

शारीरिक शिक्षणाच्या तासिकेत वाढ व्हावी-

शारीरिक शिक्षण विषयाच्या तासिकेत वाढ व्हावी. प्राथमिक स्तरापासून शारीरिक शिक्षण विषयासाठी शारीरिक शिक्षक असावा.

शारीरिक शिक्षण शिक्षक पदभरती व्हावी

अनेक वर्षे शारीरिक शिक्षण पदभरती झाली नसल्याने लाखो पदवीधर बेरोजगार झाले असून व्यवस्थेचा बळी ठरू पाहत आहेत, त्यामुळे लवकर पदभरती करून न्याय द्यावा.

टी.ई.टी.प्रमाणपत्र वैध्यताची मुदत वाढ मिळावी

नवीन पदभरतीत 2012 पासून पदभरती न झाल्याने वयोमर्यादेची अट 8 वर्षांनी शिथील करण्यात यावी.
तसेच टी.ई.टी.प्रमाणपत्र वैध्यता ७ वर्षाची आहे तीही वाढवून मिळावी.

26 नोव्हेंबर 2019 रोजी प्रसिद्ध राजपत्रात प्रसिद्ध मसुद्यास आम्ही नोंदविलेल्या हरकती संदर्भात विचार विनीमय व्हावा.

प्राथमिक पासूनच शारीरिक शिक्षण शिक्षकाची नेमणूक व्हावी-

शैक्षणिक धोरण 2020 मध्ये प्राथमिक शिक्षणापासून शारीरिक शिक्षण शिक्षक असावा या संदर्भात केंद्रास अभिप्राय – सूचना द्याव्यात.अशी मागणी शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ सिंधुदुर्गच्यावतीने जिल्हा अध्यक्ष बयाजी बुराण, राज्य समन्वयक दत्तात्रय मारकड, यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा