You are currently viewing राज्य शिक्षक समिती च्या वतीने उदय सामंत यांना आंतरजिल्हा बदली व शिक्षक भरती बाबत निवेदनाद्वारे मागणी

राज्य शिक्षक समिती च्या वतीने उदय सामंत यांना आंतरजिल्हा बदली व शिक्षक भरती बाबत निवेदनाद्वारे मागणी

सिंधुदुर्गनगरी :

सिंधुदुर्ग व कोकण विभागातील अन्य जिल्हयातील आंतर जिल्हा बदली प्रक्रिया बाबत प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांबाबत व विशेष शिक्षक भरतीचा टप्पा राबविणे बाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्य शाखा व सिंधुदुर्ग शाखेच्या वतीने मान नाम श्री उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग यांना सिंधुदुर्गनगरी येथे निवेदन देऊन मागणी करण्यात आली. यावेळी राज्याध्यक्ष उदय शिंदे, राज्य, उपाध्यक्ष राजन कोरगावकर, जिल्हाध्यक्ष नितीन कदम, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे, जिल्हा कार्याध्यक्ष नारायण नाईक, जिल्हा सल्लागार सुगंध तांबे, कणकवली शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडीस, कुडाळ शिक्षक नेते शशांक आटक, सातारा प्राथमिक शिक्षक बॅंकेचे संचालक किरण यादव आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10 पटसंख्येच्या शाळांमधील 138 रिक्त उपशिक्षकांच्या जागा, शिक्षक भरती विशेष टप्पा राबवून भरण्यात याव्यात, 0पटसंख्येच्या 34 शिक्षकांचे तात्काळ समायोजन करावे, 209 पदवीधर रिक्त पदे सेवेतील विज्ञान शाखेतून डी. एड. शिक्षकांना विकल्प घेऊन पदोन्नती देण्यात यावी, आंतरजिल्हा बदली टप्पा क्र 1,3 व 4 मधील 108 बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करावे, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 10% रिक्तपदांची अट शिथिल करावी, कोव्हीड 19 चा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढता प्रादुर्भाव विचारात घेता सन 2019-20 चे समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शाळांचे तालुकास्तरीय लेखा परीक्षण कॅम्प तात्काळ रद्द करून पुढे ढकलण्यात यावेत आदी विविध मागण्यांबाबत मान नाम श्री उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग यांचे सोबत प्राथमिक शिक्षक समिती शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली.

याबाबत लवकर मान ग्रामविकास विभागाशी शिक्षक भरती व अन्य प्रश्नांबाबत संघटना शिष्टमंडळासोबत बैठक आयोजित करण्यात येईल तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10% पेक्षा जास्त रिक्त असलेल्या शिक्षकांच्या पदांबाबत लवकरच योग्य निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्तीबाबतही विचार केला जाईल असे स्पष्ट भूमिका मान नाम श्री उदय सामंत यांनी राज्याध्यक्ष श्री उदय शिंदे व शिक्षक समिती शिष्टमंडळासमोर व्यक्त केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोव्हीड 19 चा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई मार्फत जिल्हयाबाहेरील लेखा परीक्षण टीमकडून जिल्हयातील शाळांचे लेखा परीक्षण तालुकास्तरीय कॅम्प तात्काळ रद्द करून पुढे ढकलण्यात येतील याबाबत संबधित विभागाला सूचना दिल्या जातील असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या 10% पेक्षा जास्त रिक्त पदे असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तात्काळ शिक्षक भरतीचा विशेष टप्पा सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवावा, 10 पटसंख्येच्या शाळांमध्ये नवीन पद भरू नये ही शासनाची अट रद्द करावी, पदवीधरांच्या 209 रिक्तपदे सेवेतील विज्ञान शाखेतील डी. एड. शिक्षकांना पदोन्नती ने भरण्यात यावीत व सिंधुदुर्ग जिल्हयात रिक्त पदांचा प्रश्न कायम स्वरूपी निकाली काढण्यासाठी व आंतरजिल्हा बदलीचाही प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग व राज्य शाखेचे प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहेत अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सामान्य शिक्षक व पालक वर्गातून होत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा