झाराप-पत्रादेवी चौपदरी महामार्गावर महामार्ग वाहतूक पोलिसांनी शनिवारी दुपारी वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकांची तपासणी केली.
जनता कर्फ्यू असतानाही मायनिंग व वाळू वाहतुक मात्र सुरू आहे. या वाहतुकीला आक्षेप घेण्यात आला होता. माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मायनिंग वाहतुकीला केंद्र सरकारने परमिशन दिली आहे. तरीही जागतिक महामारी च्या पार्श्वभूमीवर सूचना केली जाईल. असे पत्रकार परिषदेत सांगितले होते.
दरम्यान शनिवारी दुपारी झाराप-पत्रादेवी महामार्गावर वाहतूक पोलिसांनी वाळू वाहतूक करणारे डंपर रोखले. गोव्यातून वाळू खाली करून परतीच्या प्रवासात असलेल्या डंपर चालकांचे परवाने पोलिसांनी तपासले.