You are currently viewing जिल्ह्यात 1 लाख 30 हजार 727 जणांनी घेतला पहिला डोस

जिल्ह्यात 1 लाख 30 हजार 727 जणांनी घेतला पहिला डोस

सिंधुदुर्गनगरी

वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 30 हजार 727 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

 यामध्ये एकूण 9 हजार 482 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 6 हजार 574 जणांनी दुसरा डोस घेतला.  7 हजार 789 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 3 हजार 970 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 56 हजार 504 व्यक्तींनी पहिला डोस तर 19 हजार 885 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 44 हजार 500 नागरिकांनी पहिला डोस तर 4 हजार 1548 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.  18 ते 44 वर्षे वयोगटातील 12 हजार 452 जणांनी पहिला डोस डोस घेतला आहे. असे एकूण 1 लाख 65 हजार 404  नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 1 लाख 63 हजार 930 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 1 लाख 30 हजार 34 लसी या कोविशिल्डच्या तर 35 हजार 370 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 1 लाख 25 हजार 730 कोविशिल्ड आणि 36 हजार 290 कोवॅक्सिन असे मिळून 1 लाख 62 हजार 20 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 1 हजार 790 लसी असून त्यापैकी 1 हजार 630 कोविशिल्डच्या तर 160 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 120 कोविशिल्डच्या लसी शिल्लक आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा