You are currently viewing बनी नाडकर्णीच्या पुढाकारातून कुडाळ शहरात कोरोना प्रतिबंधक मोहिम

बनी नाडकर्णीच्या पुढाकारातून कुडाळ शहरात कोरोना प्रतिबंधक मोहिम

संजु विरनोडकर टिंमचे सहकार्य.

जिल्ह्यात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळण्याचे ठिकाण कुडाळ शहर व परिसर बनले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून तसेच एस.टी. कामगार सेना राज्य उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण कुडाळ शहर, परिसर, सरकारी हॉस्पिटल, पोलिस स्टेशन अशा वर्दळीच्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक निर्जंतुकीकरण करण्यात आले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला त्याचबरोबर येत्या काही दिवसात कुडाळ तालुक्यातील छोट्या बाजारपेठा या ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्याची संकल्पना धीरज परब यानी माडली. या उपक्रमात संजु विरनोडकर,संतोष सागर मळगावकर, आकाश मराठे, बंटी जामदार, मंदार पिळणकर, तुषार बांदेकर, ज्ञानेश्वर पाटकर, गुरुप्रसाद चिटणीस, सेबॅस्टीन फर्नांडिस, राजू कासकर, समीर वाळके, सुमेध काणेकर व मनसे कार्यकर्ते सहभागी झाले. बनी नाडकर्णी यांनी कुडाळ शहरात हा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली.

याचबरोबर त्यांनी जिल्ह्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना गावोगावी घरोघरी अशी नियोजनाची गरज मोहीम राबवावी व कोरोन प्रतिबंधक मोहिमेत सामील व्हावे असे आवाहन केले संजू विरनोडकर टीमच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर जे परिश्रम घेतले त्याबद्दल या टीमचे व मनसेच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले कुडाळ शहरातील नागरिकांनी देखील या उपक्रमाची प्रशंसा केली.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा